ओला इलेक्ट्रिक चे अद्वितीय वर्ष - विकले रेकॉर्ड ब्रेकिंग २५००००+ युनिट्स 

ओला इलेक्ट्रिक ने 1 जानेवारी ते २३ डिसेंबर २०२३ पर्यंत 252647 युनिट्सची विक्री करण्याचा टप्पा गाठला आहे. ओला ने नोव्हेंबरमध्ये 29898 युनिट्सची सर्वोत्तम विक्री नोंदवली आहे.

ओला इलेक्ट्रिक ने 2021 मध्ये s1 इलेक्ट्रिक स्कूटरने आपला प्रवास सुरू केला. तामिळनाडूच्या कृष्णगिरी जिल्ह्यात वसलेल्या पोचमपल्ली येथे असलेल्या त्याच्या प्लांट मधून उत्पादन सुरू झाले.

ओला इलेक्ट्रिक च्या विक्रीत मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षी लक्षणीय 130% वाढ झाली आहे. सध्या ओला या सेगमेंट मध्ये 30% पेक्षा जास्त market शेअर होल्ड करते आहे.

ओला इलेक्ट्रिक च्या लाइनअपमध्ये इलेक्ट्रिक स्कूटर S1 Pro, S1 Air आणि S1 X यांचा समावेश आहे. S1 Pro (सेकंड जनरेशन) ची किंमत 1.48 लाख रुपये आहे.

Ola S1 Air 1.20 लाख रुपयांना उपलब्ध आहे. आणि S1 X ची किंमत 90000 रुपये आहे.