Land Rover Discovery Sport 2024 आलिशान कार झाली लौनच ,Premium Luxury आता अधिक नवीन दिमाखात.

Land Rover Discovery Sport 2024 Exterior

२०२४ Land Rover Discovery Sport च्या एक्सटीरियर्स स्टाइलिंग मधे मोठे बदल नाहीत पण काही आकर्षक सुधारणा आहेत,जसे की Discovery badge हा आता ग्लॉस ब्लॅक फिनिश मधे आहे,ग्रील बंपर चा खालील भाग, हा सुद्धा ब्लॅक फिनिश मधे आहे.१९ इंच आलोय व्हील्स सुद्धा ब्लैक ग्लॉस आहेत.एक नवा रंग Varesine ब्लू सुद्धा उपलब्ध होणार आहे.

Land Rover Discovery Sport marathi

Land Rover Discovery Sport 2024 interior

Land Rover Discovery Sport 2024 मधे नवीन ११.४ इंच कर्व्ड ग्लास Pivi प्रो टचस्क्रीन सेंट कंसोल येते.Pivi प्रो इन्फोटेन्मेंट system चा वापर करून यूज़र इन्फोटेन्मेंट चे ९०% फिचर्स होम बटन वापर न करता वापरू शकतात. Discovery Sport ला ७ सीटर लेआउट आहे जो २४ प्रकारे कॉन्फिगर केला जाऊ शकतो. Land Rover Discovery Sport 2024 ला लेदर upholstery आणि पॅनरोमिक सनरूफ आहे.

Land Rover Discovery Sport 2024 features

फिचर्स तर भरभरून येतात Land Rover Discovery Sport 2024 मधे जसे की ३डी सराउंड कॅमेरे ,पारदर्शक बोनेट फंक्शन,डिजीटल रिअर mirror.लक्षवेधक अशी Land Rover ची कैबिन एयर Purification सिस्टम ज्यात PM२.५ फिल्टरेशन आणि CO२ मैनेजमेंट येते.

Land Rover Discovery Sport 2024 Price

Land Rover Discovery Sport 2024 ही ६७.९० लाख एक्स शोरूम किंमती पासून सुरु होते. Land Rover Discovery Sport 2024 हीला २.० लीटरपेट्रोल इंजिन २४५ bhp पॉवर आणि ३६५ Nm टॉर्क निर्माण करते. तर २.० लिटर डिझेल इंजिन २०१ bhp आणि ४३० Nm जबरदस्त टॉर्क देते.गियरबॉक्स हा ९ स्पीड ऑटोमेटिक आहे.

Scroll to Top