आजच्या घडीला पेट्रोलनी शंभरी पार करून वर्ष उलटले आहे. तर हीच ती योग्य वेळ आहे का इलेक्ट्रिक स्कूटर (Electric scooter)खरेदी करण्याची? वाढत्या पेट्रोल च्या किमतीला पर्याय म्हणून लोकं स्वस्त आणि टिकाऊ इंधनाचा प्रकार शोधत आहेत. या मुळेच पेट्रोल स्कूटर वरून बॅटरी वर चालणाऱ्या इलेक्ट्रिक स्कूटर(Electric scooter) हा वाहतुकीचा पर्याय बनत आहे. सरकार देखील आत्ता इलेक्ट्रिक स्कूटर्स विकत घ्यायला प्राधान्य आणि प्रोत्साहन देत आहे. सरकारने फेम(faster adoption and manufacturing of hybrid and Electric Vehicle) हि योजना देखील आणली होती ज्यातून इलेक्ट्रिक स्कूटर वर सबसिडी मिळत असे. कालांतराने हि सबसिडी कमी करण्यात आली आहे.
जर तुम्ही स्कूटर घेण्यासाठी मार्केट मध्ये पाहत असाल तर इलेक्ट्रिक स्कूटर(Electric scooter) कशा प्रकारे फायदेशीर आहे हे पाहूया.
Calculations गोळा बेरीज
तुमचा रोजचा वापर ३०किलोमीटर चा असेल .कोणतीही चांगली पेट्रोल स्कूटर चे मायलेज सरासरी ५० KMPL च्या आसपास राहते. रोजचे ३० या प्रमाणे महिन्याचे ९००किलोमीटर सामान्यपणे होतात. ९०० किलोमीटर धावण्यास पेट्रोल स्कूटर ला महिन्याचे १८ लिटर पेट्रोल लागेल. १०० रुपये लिटर प्रमाणे १८०० रुपये प्रति महिना होतात. तेच १ चांगली इलेक्ट्रिक स्कूटर एका चार्ज मध्ये ८०-१०० किलोमीटर जाते. एक इलेक्ट्रिक स्कूटर(Electric scooter) चार्ज करण्यासाठी ३-४ युनिट वीज लागते. कमर्शियल वीज दर अधिकतम १० रुपये प्रति युनिट पकडून देखील हि किंमत ४० रुपये होते. एका महिन्यात ९०० किलोमीटर जाण्यास इलेक्ट्रिक स्कूटर ला १० -११ वेळा चार्ज करावे लागेल. एका चार्ज ला ४० या प्रमाणे महिन्याला ४४० रुपये खर्च येईल.
Conclusion तात्पर्य-
यावरील calculations बघून नक्कीच सरळ सरळ लक्षात येते कि इलेक्ट्रिक स्कूटर(Electric scooter) ने दर महा १३५० - १३६० रुपयांची बचत होते म्हणजेच वार्षिक १६२०० रुपयांची बचत होईल.
आता पाहूया कॉस्ट analysis इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करताना त्याची किंमत हि पेट्रोल स्कूटर हुन
१७०००-१८००० जास्त राहते. हा किमतीतला फरक हा एका वर्षाच्या इलेक्ट्रिक
स्कूटर च्या running cost च्या बचतीने शून्य होईल. दुसऱ्या वर्षापासून
इलेक्ट्रिक स्कूटर हि आपली बचतच करून देत राहील.
Cost comparison Electric vs Petrol Scooter
निष्कर्ष
इलेक्ट्रिक स्कूटर(Electric scooter) फक्त तुमची आर्थिक बचत च नाही करत तर बरोबरीने पर्यावरणाचे संवर्धन देखील करते. इलेक्ट्रिक स्कूटर चालवतानाचे इन्स्टंट pickup/acceleration आणि कमीतकमी vibrations ,शांतता हि अनुभवल्याशिवाय समजत नाही.
FAQs
How much unit of electricity is consumed by electric scooter in India to charge?
An average electric scooter in India with maximum battery capacity of 4KWH should need 4 units of electricity to fully charge from 0 -100%.