Electric scooter इलेक्ट्रिक स्कूटर किंवा ई-स्कूटर हे वाहतुकीचे एक पर्यावरणास अनुकूल साधन आहे जे सोयीस्कर तसेच रोमहर्षक देखील असू शकते. Electric scooter खरेदी करणे आपल्या जीवनशैलीसाठी देखील योग्य होऊ शकते. समस्या योग्य Electric scooter निवडण्यात आहे. बाजारात अनेक पर्याय उपलब्ध आहेत आणि त्यामुळे तुमच्यासाठी योग्य असलेली Electric scooter निवडणे कठीण आहे. या 7 गोष्टी लक्षात घ्या तुमची निवड Definitely चुकणार नाही
1.तुम्ही कोणत्याही अडचणीशिवाय Electric scooter चार्ज करू शकता याची खात्री करा
Electric scooter मालकीचा मुख्य भाग म्हणजे तुम्ही जास्त ताण न घेता वाहन चार्ज करू शकणे. काही शहरी भागात तुमची स्वतःची पार्किंग ची जागा असली तरीही सोसायटी तुमच्या जागेपर्यंत पॉवरलाईन नेण्याची परवानगी देण्यास नकार देऊ शकते, तेव्हा electric scooter खरेदी करण्यापूर्वी या गोष्टीची खात्री करून घेणे योग्य ठरेल की आपण तीच्या चार्जिंग ची सोय सहज करू शकू का.
अनेक electric scooter मध्ये काढता येण्याजोगी बॅटरी असते , त्यामुळे तुम्हाला असे वाटू शकते की तुम्ही बॅटरी चार्ज करण्यासाठी ती तुमच्या घरी घेऊन जाऊ शकता ,परंतु अशा बॅटरी खूप वजनदार असतात आणि त्या 7 किलोग्रॅम ते 25 किलोग्रॅमपर्यंत कितीही वजनाला भरू शकतात.अशी वजनदार बॅटरी ची गाडी पासून घरापर्यंत आणि पुन्हा चार्ज झाल्यावर गाडीपर्यंत वाहतूक सातत्याने करणे अत्यंत कष्टाचे ठरू शकते.त्यामुळे swappable बॅटरी असलेली Electric Scooter घेताणा त्याची बॅटरीचे वजन हाताळून पहावे.
2.फास्ट चार्जिंग
एथर आणि ओला सारख्या electric scooter बनवणाऱ्या कंपन्या सार्वजनिक ठिकाणी जलद चार्जिंग देतात . असे असले तरी, तुमच्या electric scooter चार्ज करण्यासाठी त्यावर अवलंबून राहण्याऐवजी केवळ प्रासंगिक वापरासाठी याचा विचार केला पाहिजे.फास्ट चार्जिंगने ८० टक्के चार्ज करण्यास कमीत कमी ३०-४५ मिनिटे लागतात. या सेवा आता मोफत असतील, परंतु त्या कायमस्वरूपी मोफत राहणार नाहीत आणि electric scooter ची संख्या जसजशी वाढत जाईल तसतसे ते खूप व्यस्त होतील.
3.Electric scooter देऊ शकणाऱ्या विविध फायद्यांचा विचार करा.
बहुतांश लोकांसाठी electric scooter खरेदीची दोन प्रमुख कारणे असतात. एक म्हणजे चालवण्याचा कमी खर्च आणि दुसरे म्हणजे कमी maintenance cost. असे असले तरी, आणखी बरेच काही आहे जे electric scooter ला आकर्षक बनवते. मुळात, Petrol गाड्यां पेक्षा या गाड्या चालवायला अधिक आरमदायी असतात. गाडी चालवताना ची पूर्ण शांतता आणि गाडीने अजिबात न दिलेली vibrations ,instant acceleration हि अशी गोष्ट आहे जी तुम्हाला electric scooter च्या प्रेमात पाडू शकते. Ather ,Ola यां सारख्या scooters ला शहरात पकडणे तर शक्य नाही.त्यामुळे वेगाचे आणि ड्राइविंग ची आवडअसल्यास देखील इव्ह Electric scooter चांगला पर्याय आहे.
4. तुम्हाला खरोखर किती रेंज च्या गाडीची गरज आहे याचा विचार करा.
पेट्रोल वाहने पेट्रोल पंपांच्या मुबलक उपलब्धी मुळे सहजरित्या इंधनाने भरल्या जाऊ शकतात. Electric scooter च्या बाबतीत मात्र ते अजूनतरी सहजशक्य नाहीये.
तुमचे रोजचे साधारण किती किलोमीटर चे running आहे या गोष्टीचा गांभीर्याने विचार करणे अशा वेळी मदतीचे ठरते. उदाहरणार्थ, जर तुमचे कामाचे ठिकाण ते घर हे अंतर, येऊन-जाऊन ४० किलोमीटर भरत असेल तर, ६०-७० किलोमीटर ची खात्रीशीर I.D.C रेंज असलेली हि electric scooter निवडण्यास प्राधान्य द्यावे.जर तुमची रोजची रनींग कमी असल्यास आणि चार्जिंग सहज शक्य असल्यास ज्यादा रेंज किंवा मोठी बॅटरी पॅक ची Electric scooter मधे ज्यादा खर्चहोईल.
5. तुमची electric scooter च्या खरेदीने नक्की केवढी बचत होईल ते आधी पडताळून पाहा .
रेप्युटेड ब्रँडची Electric scooter घेण्यातच फायदा आहे. कारण या ब्रॅंड्स अनेक वर्ष, Scooter बनवण्याचा अनुभव असतो, आणि ग्राहकहँडल करणे , सर्व्हिस, spare parts मिळण्यास प्रॉब्लेम येत नाही आणि Electric Scooter ची quality ची हमी देखील मिळू शकते.