Nexon एकमेव भारतातील कार जी पेट्रोल डिझेल इलेक्ट्रिक आणि आता सीएनजी मधे मिळणार आहे.Nexon iCNG एक नवीन मापदंड होईल CNG लक्जरीचा.
टाटाने आपली Nexon iCNG मार्केटमधे आणून सर्वांना आश्चर्यचकीत करून टाकले आहे.या iCNG Nexon मधे असे काही फिचर्स देण्यात आले आहेत जे स्टँडर्ड nexon मधे सध्या उपलब्ध नाहीत.
Nexon सीएनजी ही ८ variants मधे उपलब्ध असणारा आहेत .
Smart(o) ,Smart+ ,Smart+ S ,Pure ,Pure S, Creative, Creative +, Fearless+PS
Nexon iCNG ची किंमत ८.९९ लाख एक्स शोरूम पासून सुरू होते ,ती १४.५९ लाख पर्यंत एक्स शोरूम जाते.
Nexon iCNG मधे पॅनरोमिक सनरूफ मिळते जे सध्याच्या कोणत्याच Nexon मधे मिळत नाही.
Nexon iCNG ही एकमेव सीएनजी कार आहे जिला ६ स्पीड गियरबॉक्स मिळतो.
Nexon iCNG मधे ट्विन सिलिंडर टेक्नोलॉजी वापरली आहे यामुळे सीएनजी हा ३० लीटर (वॉटर)च्या दोन cng tanks मधे बसतो .असे असून देखील ३२० लीटर चा बूट स्पेस मिळणार आहे.यामुळे CNG असून देखील बुट स्पेस मधे कमतरता नाही.