सादर झाली नवीन Skoda Kylaq
Kushaq आणि Slavia नंतर Skoda चे भारतासाठी लॉन्च होणारे तिसरे मॉडेल.

स्कोडाने आपल्या ५ स्टार सेफ्टी असणाऱ्या यशस्वी MQB-A0-IN प्लॅटफॉर्मवर स्थित नवीन Skoda Kylaq लाँच करण्यापूर्वी आज अनावरण करण्यात आले आहे. या कारसह Skoda ने sub 4m SUV प्रकारात प्रवेश करण्याची ही पहिलीच वेळ आहे. Skoda ची ही sub 4m SUV ब्रँडची भारतीय बाजारपेठेत पोहोच वाढवण्यासाठी आणि व्हॉल्यूम वाढवण्यासाठी महत्वाची भूमिका बजावणार आहे.

Skoda Kylaq marathi

Skoda Kylaq, संस्कृत शब्दावरून आलेले नाव, MQB-A0-IN प्लॅटफॉर्मवर आधारित असलेले Kushaq SUV आणि Slavia sedan नंतर Skoda चे तिसरे वाहन आहे आणि Skoda च्या यशस्वी "इंडिया 2.0" प्रकल्पाचा एक भाग आहे. नवीन Kylaq सब 4 मीटर एसयूव्ही असेल. हे Tata Nexon, Maruti Brezza, Hyundai Venue, Kia Sonet, Mahindra XUV3XO, Nissan magnite आणि Renault Kiger या कारशी स्पर्धा करेल .

Skoda Kylaq मराठी

एक्सटीरियर स्टाइलिंग मधे स्लिम एलईडी हेडलॅम्प, एलईडी डीआरएल आणि बटरफ्लाय ग्रिल आहे. सिंगल-पेन सनरूफ व्हॉईस कमांडसह, शार्क फिन अँटेना, रूफ-माउंट केलेले स्पॉयलर, नवीन एलईडी टेल लॅम्प आणि नवीन डिझाइन केलेले 17-इंच अलॉय, टर्न इंडिकेटर आणि रिव्हर्स लॅम्प देखील एलईडी आहेत, जे अद्वितीय आहे. बूट स्पेस 446L जी सर्वात मोठी आहे,ही सेकंड रो सीट्स फोल्ड करुन 1,265L पर्यंत वाढविली जाऊ शकते.

Skoda kylaq Marathi

Skoda Kylaq ची लांबी 3,995mm असेल, 2,566mm लांब व्हीलबेस आणि ग्राउंड क्लीयरन्स 189mm असेल. इंटिरियर्स मधे वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्ले, वायरलेस चार्जिंग सुविधा आणि 8-इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टरसह एक मोठी 10-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आहे. ॲडजस्टेबल रीअर एसी व्हेंट्स, वायरलेस चार्जिंग पॅड आणि कीलेस एंट्रीसह पुढील आणि मागील बाजूस C टाइप-USB पोर्ट . विशेष म्हणजे, समोरच्या दोन्ही सीट इलेक्ट्रिकली ऑपरेटेड आणि वेंटिलेटेड आहेत. ऑटोडिंमिंग IRVM ,मूडलाइटस देखील आहे. Kylaq च्या टॉप स्पेक ट्रिम्सना MySkoda Connect Suite द्वारे कनेक्टिव्हिटी आहे.

Kylaq marathi autotechguide

सेफ्टी फिचर्स

सेफ्टीमध्ये 6 एअरबॅग्ज, ट्रॅक्शन कंट्रोल, स्टॅबिलिटी कंट्रोल, इलेक्ट्रॉनिक ब्रेक डिस्ट्रिब्युशन, रोलओव्हर प्रोटेक्शन आणि इलेक्ट्रॉनिक डिफरेंशियल लॉकिंग सिस्टीम यांचा समावेश असेल. टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम (TPMS), इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल (ESC) आणि हिल-होल्ड असिस्ट याशिवाय ABS, पॅसेंजर एअरबॅग डी-ॲक्टिव्हेशन आणि मोटर स्लिप रेग्युलेशनसह सुरक्षितता आणखी वाढवली जाईल.

Skoda kylaq marathi

इंजिन आणि गियरबॉक्स

Skoda Kylaq मध्ये एकमेव 1.0L TSI पेट्रोल इंजिन असेल. हे इंजिन, जे कुशाक आणि स्लाव्हियाला मधे देखील वापरले जाते, 115 hp पॉवर आणि 178 Nm टॉर्क देते. नवीन Kylaq जो फ्रंट व्हील ड्राइव्ह स्वरूपात सादर केला जाईल तो 6-स्पीड मॅन्युअल किंवा 6-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनशी जोडला जाईल. दोन ड्राईव्ह मोड आहेत - नॉर्मल आणि स्पोर्ट.

नवीन Skoda Kylaq 7.89 लाख (Ex-sh) च्या सुरुवातीच्या किमतीत लॉन्च करण्यात आली आहे. 2 डिसेंबरपासून बुकिंग सुरू आहे. 27 जानेवारी 2025 पासून वितरण सुरू होणार आहे.

Scroll to Top