टाटा मोटर्सने भारत मोबिलिटी ग्लोबल एक्सपो २०२४ मधे Tata Curvv SUV सादर केली.
Tata Curvv SUV ही मागील वर्षी ऑटो एक्सपो मधे दाखवलेल्या मॉडलच्या तुलनेत खूप बदलेली दिसली,या वर्षीचे मॉडल हे जवळ जवळ ९०% प्रोडक्शन रेडी होते.गाडीला नवीन आलोय व्हील्स डिज़ाइन जे पूर्वी नव्हते,मोठे व्हील आर्चेस,flush डोर हँडल्स,पाठीमागे कनेक्टेड led tailight हे जवळ जवळ प्रोडक्शन लुक दाखवतात.
समोरील बाजूस led डेटाइम रनिंग लाइट्स (DRLs) आणि लाइटबर जो टाटाच्या नवीन डिज़ाइन भाषा दाखवतो जी नेक्सॉन,पंच ,हॅरिअर,सफारी मधे दिसते.फ्रंट ग्रिल,बम्पर आणि हेडलाइट ही देखील बदले आहेत,स्किड प्लेट हे अधिकचे प्रोटेक्शन देईल.
Tata Curvv ही ४३०८ एमएम लांब,१८१० एमएम वाइड,१६३० एमएम उंच,vआणि २५६० एमएम व्हीलबेसची आहे. Curvvला ४२२ लीटर चा बूट किवा लगेज स्पेस मिळतो. Curvv SUVला १.५ लिटर ४ सिलिंडर डीज़ल इंजिन मिळते जे ११३ bhp पॉवर आणि २६० Nm पीक टॉर्क निर्माण करते.ह्या सोबत मागील वर्षी टाटा मोटर्सने १.२ लीटर पेट्रोल इंजिन सुद्धा curvv साठी दाखवले होते.
या सर्व बदलांमागे टाटा मोटर्सचे SUV मार्केटमधे Nexon आणि Harrier यांमधला गैप भरून काढणारी SUV ला किती महत्त्व देते हे लक्षात येते.