Inster ही hyundaiच्या Casper माइक्रो SUV वरती आधारीत आहे.
पण आकारमानाने ही Casper पेक्षा थोडीशी मोठी आहे.पिक्सेल टेललाइट हे रिअर डिझाईनचे आकर्षक्षण आहे.
इंटीरियर मधे लाइट क्रीम थीम आहे.फ्लॅट फ्लोर आणि सेंट्रल टनल गैरहजर असल्याने जास्त स्पेस मिळते.इंटीरियर डिज़ाइन एकदम minimalist आहे.
डॅशबोर्ड हा ड्यूल टोन आहे १०.२५ इंच फुल डिजिटल ड्राइवर डिस्प्ले येतो.१०.२५ इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट .वायरलेस फ़ोन चार्जर ,६४ कलर एम्बिएंट लाइट हे इंटेरियर चे फिचर्सआहेत.
Hyundai Inster ला ४२ kwh स्टँडर्ड आणि ४९ क्व्ह लोंगरेंज बॅटरी मिळते.बेस मॉडल ७१.१ क्व पॉवर देणारी मोटर मिळते तर लाँग रेंज ला ८४.५ पॉवर देणारी मोटर मिळते. दोन्ही मॉडलला १४७ Nm टॉर्क मिळतो.
Inster ला ३५५km WLTP रेंज मिळेल.चार्जिंग १०-८० टक्के केवळ ३० मिनिटात १२० kw डीसी. चार्जर ने होऊ शकते.शिवाय ३६० डिग्री कैमरा ADAS सारखे फिचर्स आहेत.ही कार भारतात कधी येणार या बदल काही ऑफिशल माहिती देण्यात नाही आली.