ओला इलेक्ट्रिकने S1X इलेक्ट्रिक स्कूटर चे नवीन लाँग रेंज १९० किमी चे अनावरण केले.
Ola S1 X चे हे लेट्स्ट मॉडेल ४ kWh बॅटरीसह येते,ही बॅटरी IP67 रेटिंगसह येते.
यामुळे S1 X ची IDC रेंज १९० किमी एवढी आहे.
Ola S1X चे बेस मॉडेल २/३ kWh बॅटरीसह येते.Ola S1 X+ 3kWh बॅटरीसह येते आणि सोबत स्मार्ट कनेक्टिविटी सुद्धा येते.
Ola S1 X सोबत Ola आता ८ वर्षांची किंवा ८०००० किमी वारंटी ही विनामूल्य देत आहे.शिवाय ही वारंटी १२९९९ रुपये देऊन १२५००० किमी पर्यंत वाढवू शकतात. एवढी वारंटी देणारी एकमेव स्कूटर कंपनी आहे.
Ola S1 X हीच्या तिन्ही variants ला सात रंगांचे ऑप्शन मिळतात शिवाय यात ४ ड्यूल टोन कलर पर्याय मिळतात
Ola S1 X सीरीज ही जबरदस्त परफॉर्मन्स देणारी इलेक्ट्रिक स्कूटर आहे जी ०-४० kmph ३.३ सेकंदात जाते आणि top स्पीड ९० km/hr आणि ४ kwh बॅटरी मॉडेल १९० किमी ची रेंज (IDC) देते.
Ola S1 X ४ kWh बॅटरी मॉडलची किंमत १,०९,९९९
आहे.Ola S१ X सर्व मॉडल ५००० रुपये देऊन preorder करू शकता.