Porsche या जर्मन कार मेकर यांनी 2024 Macan Turbo EV ही त्यांची प्रीमियम ऑल इलेक्ट्रिक SUV भारतात launch केली.

Macan ही सहज एक Porsche आहे हे तिच्या आकार आणि स्टाइलिंग वरून समजून येते. ह्या SUV चे स्टाइलिंग एलिमेंट्स हे Taycan वरुण प्रेरीत आहेत.

या suv मधे नवीन फोरपॉइंट DRL हे led आहेत,साइड प्रोफाईलला नवीन २२ इंच आलोय व्हिल्स आहेत.

Macan 2024 च्या इंटीरियरमधे तीन स्क्रिन्स मिळतात एक ड्राइवर ,इन्फोटेन्मेंट,को-ड्राइवर साठी एक.एवढे असून देखील फिजिकल कंट्रोल येतात क्लाइमेटकंट्रोल सिस्टम ला.

नवीन इन्फोटेन्मेंट सिस्टम ही अँड्रिओड ऑटोमोटिव ऑपरेटिंग सिस्टम वरती आधारित आहे.यामुळे थर्ड पार्टी ऍप्प्स आणि वॉइस कमांड सपोर्ट मिळतो.हेड्स अप डिस्प्ले शिवाय लेन चेंज असिस्ट,पार्क असिस्टसारखे फिचर्स आहेत.

Porsche Macan Turbo 2024 ला १०० kwh बैटरी पैक मिळतो, दोन इलेक्ट्रिक मोटर्स ज्या ६३९ ps पॉवर आणि ११३० Nm टॉर्क निर्माण करतात.

Porsche Macan Turbo 2024 ला ५९१ km ची WLTP रेंज मिळते. ही suv ०-१०० kmph ३.३ सेकंदात जाते.,टॉप स्पीड २६० kmph आहे.

Porsche Macan Turbo EV 2024 हिची किंमत १.६५ करोड  एक्स शोरूम आहे. या SUV चे बुकिंग सुरू आहे.