Current Status of Electric Vehicles
नेहमीच जेव्हा कोणतीही technology नवीन असते तेव्हा ती महाग असते, कारण ती technology develop करण्यासाठी R & D (research and development )वर खूप खर्च करावा लागतो. पण जेव्हा हीच technology जास्तीत जास्त लोक आत्मसात करू लागतात, तेव्हा ती स्वस्त होऊ शकते. Electric vehicles (EV) च्या बाबतीत सुद्धा सध्या हेच होत आहे. त्यातच बॅटरी हा EV चा सर्वात मोठा आणि सर्वात महत्वाचा भाग आहे. बॅटरी पॅक इलेक्ट्रिक वाहनातील सुमारे 30-40% खर्चाचे प्रतिनिधित्व करतो. बॅटरी महाग आहेत. आणि त्यामुळेच Electric vehicle ची किंमत देखील वाढलेली पाहायला मिळते.
Electric Vehicles बॅटरी तयार करण्याशी संबंधित पायऱ्या
१. बॅटरी तयार करण्यासाठी जो कच्चा माल खाणींच्या मधून काढला जातो, त्यात लिथियम, कोबाल्ट, मॅंगनीज, निकेल आणि ग्रेफाइट ह्यांचा समावेश असतो. जे कि दक्षिण अमेरिका आणि ऑस्ट्रेलियामधून मागवावे लागतात.
२. प्रोसेसर आणि प्युरिफायर कच्चा माल filter करतात आणि, नंतर कॅथोड आणि एनोड डायनॅमिक बॅटरी मटेरियल बनवण्यासाठी त्यांचा वापर करतात; प्रोसेसर आणि प्युरिफायर तसेच इलेक्ट्रोड निर्माते सामान्यतः चीनमध्ये आहेत. ते डायनॅमिक बॅटरी मटेरियल खरेदी करतात आणि बॅटरी सेल तयार करतात.
३. भारतात बॅटरी निर्माते चीनमधून आयात केलेल्या बॅटरी सेलला मॉड्यूलमध्ये एकत्र करतात आणि नंतर पॅक करतात आणि ऑटोमेकर्सना देतात.
बॅटरी बनवण्यासाठी प्रोसेसर आणि प्युरिफायर तसेच इलेक्ट्रोड निर्माते भारतातच असतील तर खर्च कमी होईल. पण वरील तिन्ही पायऱ्या भारतात स्थापन करण्या साठी खूप साऱ्या investment ची गरज आहे, जी कि सध्य परिस्थितीत केली तरी, China मधून येणाऱ्या बॅटरी सेल ची किंमत match करण्यास आपल्याला वेळ जाईल. म्हणूनच ऑटोमेकर्स बॅटरी ला लागणाऱ्या सेलस वेगवेगळ्या ठिकाणी बनवून घेऊन वापरतात. त्यामुळे बॅटरीच्या किंमतीवर नियंत्रण ठेवता येत नाही. यामुळे बॅटरी महाग, त्यामुळे Electric vehicle महाग आहेत.
निष्कर्ष