September 2024 इलेक्ट्रिक स्कूटर विक्रीची काय आहे परिस्थिती??

FADA ने जाहीर केलेल्या अहवालानुसार, सप्टेंबर 2024 मध्ये देशभरात इलेक्ट्रिक स्कूटरच्या 88156 युनिट्सची विक्री झाली आहे. FADA अहवालानुसार, मासिक विक्रीत 1.74 टक्के वाढ झाली आहे हीच वाढ वार्षिक आधारावर 40.45 टक्के आहे.

Hero vida

Top-5 मध्ये
5.Hero Motocorp चा नंबर ५ आहे
FADA ने जाहीर केलेल्या यादीनुसार हिरो मोटोकॉर्पने 2024 सप्टेंबर मध्ये 4310 युनिट्सची विक्री केली आहे. तर ऑगस्ट 2024 मध्ये 4742 युनिट्सची विक्री झाली होती. आकडेवारीनुसार, Hero च्या मासिक विक्रीत 11.9 टक्क्यांनी घट झाली असून वार्षिक आधारावर कंपनीची विक्री तब्बल 684 टक्क्यांनी वाढली आहे.

Ather 2024

4.Ather Energy जोमात अथरने गेल्या महिन्यात 12718 युनिट्सची विक्री केली आहे. तर ऑगस्ट कालावधीत ही संख्या 10830 युनिट होती. मासीक आधारावर 16 टक्के वाढ तर Ather ने 76.76 टक्के वार्षिक वाढ मिळवली आहे.

3.TVS
टीव्हीएसचा टॉप-3 मध्ये आहे. सप्टेंबर 2024 मध्ये एकूण 18108 युनिट्सची विक्री झाली आहे. तर यापूर्वी ऑगस्ट 2024 मध्ये कंपनीने 17543 युनिट्सची विक्री केली होती. मासिक आधारावर कंपनीने तीन टक्क्यांहून अधिक वाढ केली आहे. तर वार्षिक आधारावर TVS ने 15.96 टक्के वाढ नोंदवली आहे.

electric scooter India Baja chetak

2.बजाज
इलेक्ट्रिक स्कूटर सेगमेंटमध्ये चेतक विक्रीसाठी उपलब्ध आहे. बजाज कंपनीने सप्टेंबर 2024 मध्ये एकूण 19137 इलेक्ट्रिक वाहनांची विक्री केली आहे. तर ऑगस्ट 2024 मध्ये ही संख्या 16706 युनिट होती. कंपनीने मासिक 13 टक्के वाढ तर वार्षिक आधारावर 169 टक्क्यांहून अधिकची वाढ केली आहे.

Ola move os4 2024 marathi

1.ओला इलेक्ट्रिकने विक्रीच्या बाबतीत पहिले स्थान प्राप्त केले आहे. गेल्या महिन्यात कंपनीने 24679 युनिट्सची विक्री केली आहे. तर ऑगस्ट मधे कंपनीने 25517 युनिट्सची विक्री झाली होती. आकडेवारीनुसार, मासिक आधारावर कंपनीची 10.31 टक्के विक्री कमी झाली आहे. परंतु वार्षिक आधारावर सुमारे 32 टक्के वाढ झाली आहे.

Electric scooters sales India September 2024#

Scroll to Top